वाघोली (प्रतिनिधी) : लोणीकंद (ता. हवेली) येथी तिन्ही कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. लोणीकंद गाव कोरोनामुक्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लोणीकंदमध्ये २१ एप्रिलला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. त्याच्या संपर्कातील आणखी दोघे पॉजिटिव्ह सापडले होते. तिघांवरही खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते.
तिघेही पूर्णपणे बरे झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. तिघांचे ग्रामस्थांनी स्वागत केले. लोणीकंद ग्रामस्थांनी अतिशय काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केल्याने एकही नवीन रुग्ण अद्यापही सापडलेला नाही.