कोल्हापूर(प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असताना आज आजरा तालुक्यात दोन आणि चंदगड तालुक्यात एक, असे तीन रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. या तिघांच्या स्वॅबचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. दरम्यान, या तिघांमुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 17 झाली आहे.
आजरा तालुक्यातील दोघांवर आजरा ग्रामीण रुग्णालयात, तर चंदगड तालुक्यातील बाधितावर तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, या तिघांचे स्वॅब बुधवारी तपासणीसाठी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर प्रशासन अधिक सावध झाले.
प्रशासनाने तिघांच्या वास्तव्याची, त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. कालच सीपीआरमधून कोरोनामुक्त झालेल्या चौघांना डिस्जार्च देण्यात आला होता. आज तीन नवे रुग्ण जिल्ह्यात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्हा कोरोना स्थिती—
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित व्यक्ती – 17
कोरोनामुक्त झालेले एकूण रुग्ण – 9
कोरोना मुळे मृत्यू -1
सध्या स्थिती उपचार घेत असलेले-4
आज नव्याने कोरोना पॉझिटिव्ह -3