खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियांना परवानगी

आरोग्य मंत्र्याशी डॉक्‍टरांची चर्चा

कात्रज – खासगी हॉस्पिटल्समध्ये स्थगित केलेल्या शस्त्रक्रिया डॉक्‍टर नियोजित करू शकतात, अशी परवानगी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असल्याचे डॉ. सुनील जगताप यांनी सांगितले.

आरोग्य मंत्र्यांनी सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियांसाठी परवानगी दिल्याने त्रस्त रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. शस्त्रक्रिया करताना आरोग्य विभागाचे नियम पाळावे लागणार आहेत. लॉकडाऊनमुळे पुणे शहरातील छोटे-मोठे हॉस्पिटल बंद करण्यात आल्यानंतर यामध्ये नियोजित शस्त्रक्रियाही सुरक्षितेच्या कारणास्तव रद्द करण्यात आल्या होत्या. डॉक्‍टरांची मानसिक तयारी असून देखील शासकीय आदेश असल्यामुळे नियोजित शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. सव्वा महिना उलटल्यानंरतही अशा शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. यातून अनेक त्रस्त रुग्ण त्रास सहन करीत वाट पाहत आहेत.

याबाबत राष्ट्रवादी डॉक्‍टर सेल पुणे यांच्यावतीने गुरुवारी (दि. 7) राष्ट्रवादी डॉक्‍टर सेलचे पुणे शहराचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप तसेच डॉक्‍टर सेलचे कार्याध्यक्ष डॉ. राजेश पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर फोन कॉन्फरन्सिंगवर मीटिंग घेत पुण्यातील डॉक्‍टरांच्या सर्व अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या.

यातून उद्यापासून खासगी हॉस्पिटल्समध्ये स्थगित केलेल्या शस्त्रक्रिया नियोजित करू शकता, अशी परवानगी आरोग्य मंत्री टोपे यांनी दिल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.