काबुलमध्ये तीन बॉम्बस्फोट; 1 ठार 17 जखमी

काबुल- अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये आज एकाच दिवशी एकापाठोपाठ एक तीन बॉम्बस्फोट झाले. त्यामध्ये एक जण ठार झाला आणि किमान 17 जण जखमी झाले आहे. घुसखोर आणि गुन्हेगारांकडून चुंबकीय आवरण असलेले बॉम्ब पेरले जाऊ लगले अहेत. हे बॉम्ब वाहनांच्या खालच्या भागाला चिकटलेले असतात. काबुल शैक्षणिक विद्यापिठातील शिक्षकांना नेणाऱ्या एका बसलाही असाच बॉम्ब चुंबकाच्या सहाय्याने चिकटवला गेला होता, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्‍ते नसरत राहिमी यांनी सांगितले. पहिल्या स्फोटानंतर रस्त्याच्या कडेला पेरून ठेवलेल्या अन्य दोन बॉम्बचाही स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले.

या तिन्ही बॉम्बस्फोटात एक व्यक्‍ती ठार झाला. तर एकूण 17 जण जखमी झाले. या बॉम्बस्फोटांची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही. मात्र तालिबान आणि इस्लामिक स्टेटकडून अलिकडच्या काळात असेच बॉम्बस्फोट घडवून आणले गेले होते.

तालिबान आणि अमेरिकेमध्ये या महिन्यापासून दोहा इथे नव्याने शांतता चर्चा सुरू होणार आहे. तरीही अफगाणिस्तानात हिंसाचाराचे सत्र सुरूच आहे. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ गनी यांनी रमजानच्या महिन्यात तालिबानविरोधात शस्त्रसंधीचा प्रस्ताव मांडला होता. मात्र तालिबानकडून हा प्रस्ताव धुडकावण्यात आला.

जखमी झालेल्यांमध्ये अफगाणिस्तानातील पत्रकारही आहे. पहिला बॉम्बस्फोट झाल्याने प्रत्यक्ष वार्तांकनासाठी गेलेला असतानाच झालेल्या दुसऱ्या बॉम्बस्फोटामध्ये हा पत्रकार जखमी झाला. गेल्या वर्षी 9 पत्रकार अशाच दुसऱ्या बॉम्बस्फोटांमध्ये ठार झाले आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)