नासा टायटनवर ड्रोन पाठवण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन – “नासा’ने शनिचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या “टायटन’वर ड्रोन पाठवण्याची योजना तयार केली असून यामुळे “टायटन’संबंधी आणखी माहिती मिळविणे शक्‍य होणार आहे.

नासाने याबाबत माहिती देताना सांगितले की, भविष्यात आम्ही “ड्रॅगनफ्लाई’ नावाचे ड्रोन शनिचा उपग्रह “टायटन’वर पाठवणार आहोत. या ड्रोनमध्ये प्रोपेलरचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे टायटनवरील अनेक ठिकाणांचे संशोधन करून तेथे सूक्ष्म जीवांसाठी जीवन शक्‍य आहे का? याबाबत संशोधन केले जाणार आहे. प्रोपेलर हे यंत्र कोणत्याही यानावर बसवल्यानंतर ते संबंधित यानास पुढे ढकलण्यास मदत करते.

या मिशनअंतर्गत ड्रोनला 2026 मध्ये लॉंच करण्यात येईल आणि ते 2034 पर्यंत टायटनवर पोहोचणार आहे. या मिशनसाठी सुमारे सुमारे 85 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. नासाचे लोरी ग्लेज यांनी सांगितले, टायटनवर जीवनासाठी आवश्‍यक ती सर्व सामुग्री अस्तित्वात आहे. शनिच्या या चंद्रावर मिथेन, बर्फाळ शिखरे आणि जमिनीखाली एक महासागरही आहे. यातून असे स्पष्ट होते की, टायटनवर जीवन असण्याची शक्‍यता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.