आपल्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा करण्यासाठी सोनाक्षीने कामातून थोडा ब्रेक घेतला आहे. या ब्रेक दरम्यान केवळ आराम करणार असल्याचे तिने म्हटले आहे. आज (2 जून) सोनाक्षीचा वाढदिवस आहे. सध्या सोनाक्षी मृगदीप सिंह लांबा यांच्या आगामी सिनेमामध्ये काम करते आहे. यामध्ये तिच्याबरोबर वरुण शर्मा आणि रॅपर बादशहापण आहे. या सिनेमाच्या निमित्ताने बादशहा बॉलिवूड ऍक्टिंगच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे. या मित्रांबरोबर सोनाक्षीने शुक्रवारचे शुटिंग संपवले आणि वीक एन्ड एन्जॉय करण्यासाठी निघून गेली.
वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने मस्त प्लॅन केला आहे. आपल्या काही जुन्या मित्रांबरोबर शहरापासून दूर जाऊन एन्जॉय करण्याचे तिने ठरवले आहे. वाढदिवसाच्या पार्टीचे ठिकाण ती दरवर्षी बदलत असते. लांबा यांच्या सिनेमाव्यतिरिक्त सोनाक्षी “मिशन मंगल’, “दबंग 3′ आणि “भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ सारख्या सिनेमांमध्ये काम करते आहे. याशिवाय काही ब्रॅन्डच्या जाहिरातींचेही काम तिच्याकडे आहे. एवढ्या कामाच्या व्यापातून थोडा ब्रेक तर मिळायलाच पाहिजे. तिच्या व्यस्त शेड्युलमधून 2-3 दिवसांचा ब्रेक मिळणे अवघड आहे. मात्र वाढदिवसाचे कारण पुढे करून तिने पूर्वीपासूनच सुटीचे नियोजन केले होते.