कॅनबेरा – ऑस्ट्रेलियातील भूमीवर तब्बल 42 हजार वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या 108 पार्थिवाच्या अवशेषांवर आता पुन्हा एकदा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हे मृतदेह सुमारे पन्नास वर्षांपूर्वी संशोधनासाठी कबरीतून बाहेर काढण्यात आले होते. आता या मृतदेहांवर पुन्हा एकदा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुंगा आदिवासी जमातीच्या या लोकांच्या कबरी 1974 मध्ये खोदण्यात आल्या होत्या मृतदेह बाहेर काढून त्यावर संशोधन करण्यात आले होते तेव्हा मानवाचे अस्तित्व 42 हजार वर्षापर्यंत होते. असा निष्कर्ष संशोधनातून काढण्यात आला होता कारण हे सर्व अवशेष 42000 वर्षांचे जुने अवशेष होते. 1960 ते 1980 या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पुरातत्व खात्याने संशोधनाला सुरुवात केली होती.
तेव्हा त्यांना सिडनी शहराच्या पश्चिमेला 750 किलोमीटर अंतरावर 108 आदिवासींचे मृतदेह सापडले प्रख्यात मुंगा झिल परिसरात हे अवशेष सापडले होते. अवशेषांवर संशोधन केले असता हे अवशेष 42 हजार वर्षे जुने असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला तोपर्यंत मानवी इतिहासाचा हा सर्वात जुना पुरावा मानण्यात येत होता.
पण 2017 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या खोदकामानंतर जे अवशेष समोर आले त्याचे संशोधन केल्यानंतर मानवाचा इतिहास 65000 वर्षे पर्यंत जुना असावा निष्कर्ष काढण्यात आले 1974 मध्ये सापडलेल्या या अवशेषांबाबत अनेक वाद निर्माण झाले होते. त्यापैकी काही अवशेष संग्रहालयात ठेवण्यात आले होते. त्यावर अंत्यसंस्कार करायचा की नाही याबाबतही चर्चा झडत होत्या पण अखेर ऑस्ट्रेलियन सरकारने अधिकृतपणे निर्णय घेऊन या अवशेषांवर सरकारी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.