विमानतळावर सामान चोरल्याप्रकरणी ट्रम्पच्या माजी सहकाऱ्याला अटक

भारतीय मुळाच्या हॉटेल व्यवसायीकाचे अमेरिकेच्या विमानतळावर कृत्य
वॉशिंग्टन: अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रसिद्ध व्यवसायीक दिनेश चावला यांना गंमत जंमत म्हणुन अमेरिकेतील मेम्फिस विमानतळावरून बॅग चोरून नेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. चावला यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबासमवेत हॉटेल व्यवसायात भागीदारी केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, विमानतळ सुरक्षा फुटेजमध्ये चावला यांनी 18 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॅगेज क्‍लेम कॅरोझलमधून दुसऱ्या प्रवाशाची सूटकेस काढून आपल्या गाडीत ठेवली आणि पुन्हा येत पुढील विमानाने ते निघून गेल्याचे आढळले. पोलिसांनी जेंव्हा त्यांच्या गाडीची तपासनी केली तेंव्हा त्यांना चावला यांनी चोरलेल्या बॅगसोबत त्या गाडीत एक महिण्यापुर्वी हरवलेली एक बॅगही सापडली.

यानंतर चावला शहरात परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असून चावलायांनी या सामाना व्यतिरीक्त आणखीन काही सामान चोरल्याची कबूली दिली असून ते केवळ गंमत म्हणुन असे करत होते असेही त्यांनी यावेळी नमूद केले. चौकशीनंतर चावला यांना 5 हजार डॉलर्सचा दंड आकारुन सोडून देण्यात आले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.