मुंबई : भारतात करोनाची दुसरी लाट आली आणि सर्वच यंत्रणांवर मोठा ताण पडला. त्यामुळे भारताला साथ देण्यासाठी जगभरातून अनेक देश मदतीला सरसावले. अमेरिका, रशिया, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या अग्रगण्य देशांनी देशाला साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी ऑक्सिजन सिलिंडर, औषधे आणि निदानाची साधने यासारख्या गंभीर वैद्यकीय साहित्यांना भारतात पाठवले. आता या सर्वांमध्ये आणखी एका अशा देशाने भारताला मदत केली आहे ज्याचे आभार भारताने मानले आहेत.
पूर्व आफ्रिकेतील केनियाने भारतात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लढाईसाठी मदतीचा हात दिला आहे. या मदतीचा एक भाग म्हणून केनियाने भारतीय रेडक्रॉस सोसायटीला स्थानिक चहा, कॉफी आणि शेंगदाण्यासह १२ टन खाद्यपदार्थ दान केले आहेत.
आफ्रिकेतील भारताचे उच्चायुक्त विली बेट यांनी सांगितले की, “कोविड -१९ या महामारीच्या वेळी केनिया सरकार भारताबरोबर एकजूटपणे उभे राहावे अशी इच्छा व्यक्त करते.अन्नधान्य वस्तू देण्यास नवी दिल्लीहून आर्थिक राजधानीत आलेल्या बेट म्हणाले की, हे दान करोनाबाधित रुग्णाची सेवा करणार्यांना देण्यात आले आहे. जे लोक रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी बरेच तास काम करत असतात.
दरम्यान, सोशल मीडियावर काही युझर्सनी केनियाचा ‘गरीब देश’, ‘भिकारी देश’ असा उल्लेख केला आहे तसेच भारताने केनियाकडून स्वीकारलेल्या दानाचा निषेध केला आहे. मात्र भारतालाच नाही तर आजपर्यंत केनियाने जगातील अनेक बड्या देशांना त्यांना जमेल तशी मदत केली आहे.