मुंबई – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ मधून अभिनेत्री ‘श्रुती मराठे’ महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली आहे. मराठी सिनेविश्वातील बोल्ड अँड ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून श्रुतीला ओळखले जाते.
श्रुतीचा जन्म ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात करणाऱ्या श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत 2016 साली विवाह केला. सध्या श्रुती महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
श्रुती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या लाजवाब अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ भाषेतील ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असणारी श्रुती आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सतत आपल्या फॅन्ससह शेअर करते असते.
नुकतंच श्रुतीने आपल्या इंस्टाग्रामवर काही हॉट फोटो शेअर केले आहेत. श्रुती या फोटोंमध्ये अतिशय मादक आणि बोल्ड दिसत आहे. सध्या तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
तर काहींनी श्रुतीला ट्रोल देखील केलं आहे. तिच्या या फोटोवर एका यूजरने तर “लस घेतली का मॅडम..?, “लस घ्यायचा ड्रेस… विनोद विसरा… या लूकमध्ये कूल दिसत आहे’ असे म्हणत कमेंट केली आहे. सध्या सोशलवर श्रुतीचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहे.