ठाणे – गेल्या काही दिवसांत ठाणे शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरफोडीच्या घटनानंतर आता चोरट्याने चक्क मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. 9 नोव्हेंबरला शहरातील खोपत भागातील हनुमान मंदिरात दानपेटीची चोरी झाली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याकडून दानपेटीतील एक हजार रुपयांची रोडक जप्त केली आहे.
या चोरीचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चोर आधी देवाची पूजा करतो आणि नंतर दानपेटी घेऊन पसार झाल्याचे दिसत आहे. मंदिरातील पुजाऱ्याने चोरीच्या घटनेची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी शनिवारी चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीची रोकड जप्त करण्यात आली आहे.