ते शिवभक्त आहेत, दरोडेखोर नाहीत; संभाजीराजे पुन्हा संतापले

पुणे : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त गर्दी करू नये, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. आज शिवजयंतीनिमित्त रायगडावर जमलेल्या शिवभक्तांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या प्रकरणावरून खासदार संभाजीराजे संतप्त झाले आहेत. 

 

रायगडावर शिवभक्तांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी संभाजीराजेंनी राज्य सरकारचा निषेध केला आहे. संभाजी राजे म्हणाले की, शिवभक्तांवर झालेला लाठीचार्ज चुकीचा आहे. ते शिवभक्त आहेत, दरोडेखोर नाहीत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये,  अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त रायगडावर भारतीय पुरातत्व विभागाने रोषणाई केली आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेली रोषणाई पाहून छत्रपती संभाजीराजे भोसले यांना आपला राग अनावर झाला असल्याचे दिसत आहे. ” भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,” असा शब्दातुन संभाजीराजेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.