पाचक ब्ल्यूबेरी

उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते

ब्ल्यूबेरी हे पाश्चिमात्य फळ म्हणून ओळखलं जातं. याची लागवड प्रामुख्याने अमेरिकेत होते. या फळाची मूळ सुरुवात ही १९५० मध्ये ऑस्ट्रेलियात झाली होती. त्यानंतर १९७० मध्ये डेव्हिड जॉन नावाच्या माणसाने याच्या बिया अमेरिकेत आणून त्याची लागवड केली. मात्र आपल्याकडेही आता हे फळ काही नवीन राहिलेलं नाही.

विविध जाम आणि केक्समध्ये हे फळ वापरतात. निळ्या रंगांचं हे फळ चवीला मधूर असतं. हे फळ स्कॉटलंडमध्ये ‘ब्लेबेरी’, नॉर्वेत ‘ब्लॅबर’, त्याची पानं हिरवीगार तर फुलं घंटेच्या आकाराची असतात. त्यांचा रंग पांढरा, गुलाबी आणि लाल असतो.

फळाचा रंग अर्थातच निळा असतो मात्र कच्च्या फळाचा गर हा हिरवट रंगाचा असतो. असं हे फळ दिसायला अगदी बोरासारखं असून त्यात एक लहान बीदेखील असते. जेली, जॅम, मफिन्स आणि स्नॅक्समध्ये वापरतात.

  1. मेंदूच्या विकारांवर मात करून स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं.
  2. दररोज अर्धा कप ब्ल्यूबेरीचं सेवन केल्याने कर्करोगापासून संरक्षण करतं.
  3. त्वचेचा पोत सुधारते. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्यांचं प्रमाण कमी होतं.
  4. मूत्राशयाचं आरोग्य सुधारून लघवी साफ होते.
  5. उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखते त्यामुळे हृदयविकारापासून बचाव करते.

  6. यात जीवनसत्त्व ए, सी आणि ईचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करते.

  7. डोळ्यांचं आरोग्य सुधारतं.
  8. शरीरावर साठलेली अतिरिक्त चरबी कमी करण्याचं काम करते.
  9. पचनक्रिया सुधारते.
  10. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी या फळाचं जरूर सेवन करावं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.