‘त्यांना’ ना चर्चेत रस आहे ना संसदेचे अधिवेशन चालू देण्यात; पंतप्रधान नरेंद्र मोदी संतापले

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा काँग्रेसवर चांगलेच संतापले असल्याचे दिसत आहे. अधिवेशनातील कामकाजात अडथळा आणत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या संसदीय बैठकीत काँग्रेसविरोधात  संताप व्यक्त केला. काँग्रेस पक्षाला ना चर्चेत रस आहे, ना संसदेचे कामकाज चालू देत आहेत अशा शब्दांत टीका करत नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि इतर भाजपा नेते या बैठकीला उपस्थित होते. भाजपाच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेस सभागृहाचं कामकाज चालू देत नाही, तसंच लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीलाही हजर राहत नाही,” असे मोदी यावेळी म्हणाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांना १५ ऑगस्टनंतर आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांसमोर सत्य परिस्थिती मांडण्याचे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.