नवी दिल्ली – जागतिक बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्यानंतर भारतात सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचे दर 268 रुपयांनी वाढून 50 हजार 812 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर दिल्ली सराफात चांदीच्या दरात 1,623 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 60 हजार 700 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारांमध्ये सोन्याचे दर वाढून 1,873 डॉलर प्रती औंस झाले तर चांदीचे दर 23.32 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिर राहिले.
करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असल्यामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्याचबरोबर डॉलर कमकुवत होत आहे. या कारणामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढून सोन्याचे दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.