fbpx

SBI बचत खातेदारांनी लक्ष द्या; 1 नोव्हेंबरपासून बदलतोय ‘हा’ नियम

नवी दिल्ली –  देशातील सर्वात मोठी बॅंक भारतीय स्टेट बॅंकेच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. एक नोव्हेंबरपासून बचत खात्यावरील व्याज दरात बदल होणार असल्याचे एसबीआय कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारतीय स्टेट बॅंकेने एक नोव्हेंबर पासून आपल्या बचत खात्यात म्हणजेच बचत खात्यावरील व्याज दरात बदल करण्याची घोषणा केली आहे. एक नोव्हेंबरपासून एसबीआयच्या ज्या खात्यामध्ये एक लाख रूपयांपर्यंत रक्कम जमा आहेत त्यावर मिळणाऱ्या व्याजात कपात करण्यात येणार आहे. व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात येणार असून 3.25 टक्के व्याजदर मिळणार आहे. तसेच एक लाख रूपयांपेक्षा जास्त रक्कमेवरील व्याज आता रेपो दरानुसार मिळणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.