सातारा जिल्ह्यात शनिवार घातवार; दिवसभरात ७७ पाँझिटिव्ह

जिल्हयातील एकूण रुग्णसंख्या २७८ वर पोहचली…

सातारा (प्रतिनिधी)– सातारा जिल्ह्यासाठी शनिवार घातवार ठरला असून दिवसभरात ७७ जणांचे करोना रिपोर्ट पाँझिटिव्ह आले आहेत. शनिवारी सकाळी ४०, संध्याकाळी ६ व रात्री सव्वानऊ वाजता ३१ नवे रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या २७८ वर पोहचली आहे.

रात्री उशिरा पुण्यावरून आलेल्या रिपोर्टनुसार ३१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात गुरुवारी पाचगणी येथे मृत्यू पावलेल्या महिलेलाचाही समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे. या नव्या ३१ रुग्णांचा तपशील उशिरापर्यंत मिळाला नव्हता.

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा वाढलेले करोनाचे ३१ रुग्ण
पुरुष १६
महिला १५

कुठे कुठे वाढले…

कराड तालुका
वानरवाडी ५ रुग्ण
शेणोली ३ रुग्ण

जावळी तालुका
गावडी १ रुग्ण
बामणोली २ रुग्ण

खंडाळा तालुका
पळशी ३ रुग्ण
अंधोरी १ रुग्ण

महाबळेश्वर
पाचगणी एक (म्रुत)

सातारा तालुका
चिंचणेर लिंब १ रुग्ण
कुस खुर्द ३ रुग्ण

वाई तालुका
वाई १ रुग्ण
देगाव १ रुग्ण

कोरेगाव तालुका
वाघोली २ रुग्ण

खटाव तालुका
गादेवाडी ३रुग्ण
मांजरवाडी १ रुग्ण
चिंचणी १ रुग्ण
खातगुण १रुग्ण

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.