नवीन ९ कोरोना रुग्ण, नांदेड जिल्ह्यात एकुण १२५ रुग्ण संख्या

नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना विषाणु संदर्भात शनिवार २३ मे रोजी सायंकाळी ६ वा. पुढीलप्रमाणे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. शनिवार २३ मे रोजी प्राप्त झालेल्या एकुण १३५ अहवालापैकी १२० निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले व नवीन ३+६ रुग्णांचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यात रुग्ण संख्या १२५ झाली आहे.

प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी करबला भागातील 2 रुग्ण ( ज्यात एक पुरुष वय 38 वर्षे, 1 स्त्री वय 6 वर्षे, व कुंभार टेकडी येथील 2 रुग्ण ( 1 पुरुष वय 15 वर्षे व 1 स्त्री वय 28 वर्षे) व उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील 2 रुग्ण (1 पुरुष वय 34 वर्षे व 1 स्त्री वय 22 वर्षे) या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.

शनिवार 23 मे रोजी ग्रामीण रुग्णालय बारड येथील कोवीड सेंटर येथील 1 रुग्ण व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 2 रुग्ण असे एकुण 3 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 125 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 55 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे व उर्वरीत 62 रुग्णांवर औषध उपचार चालू आहे.

शनिवार 23 मे 2020 रोजीची कोरोना संशयीत व कोविड रुग्णांचा संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 31 हजार 407, घेतलेले स्वॅब 3 हजार 82, निगेटिव्ह स्वॅब 2 हजार 740, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 3 + 6, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 125, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 119, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यू संख्या 6, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 55, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 62, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 80 एवढी आहे.

एकुण 125 रुग्णांपैकी 6 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 55 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 62 रुग्णांपैकी 6 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. पंजाब भवन कोवीड केअर सेंटर यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 49 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण असून सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×