कोल्हापूर- मी मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळविलेला भ्रष्टाचाराचा एक पैसा जरी सिद्ध केला तर किरीट सोमय्या यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. कागल तालुक्यातील करनूर येथे विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन अशा जाहीर सभेत मुश्रीफ बोलत होते.
माझ्या मंत्रीपदाचा गैरवापर करून मिळवलेला एक जरी पैसा किरीट सोमय्या यांनी सिद्ध केला तर त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू. सगळ्याच यंत्रणांकडून माझी चौकशी केलेली आहे, त्यामधून काहीही हाती लागलेले नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
सोमय्या यांनी माझ्यावर सात महिन्यापूर्वी तक्रार केली होती, त्यामधून काहीच निष्पन्न झालेले नाही. आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्यानंतर ते पुन्हा तक्रार करीत आहेत. हा काही विशेष योगायोग नाही. काही. कोल्हापूर, कागलच्या काही मंडळींचे सीडीआर तपासल्यावर याच्यामागे कोण आहे, हे लक्षात येईल, असे मुश्रीफ म्हणाले.