इंदापूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी १०२ कोटी सत्तर लाखाचा निधी इंदापूर तालुक्यातील कळंब गावाला शासनाच्या माध्यमातून मिळवून दिल्यामुळे गावकरी आनंदित झाले असून त्यांनी रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास थेट गावातून हत्तीवरून मिरवणूक वाजत गाजत काढली.
इंदापूर तालुक्यात हत्ती चिन्ह अनेक वर्षांपूर्वी दिवंगत नेते जगन्नाथ मोरे यांना विधानसभेचे मिळालेले होते.त्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची निमगाव केतकी गावातून हत्तीवरून मिरवणूक काढत साखर वाटण्यात आली होती. आजपर्यंत ही हत्तीवरील मिरवणूक इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनली होती.
तदनंतर पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यात हत्तीवरून मिरवणूक कळंब गावकरी यांनी काढली आहे.त्यामुळे मानाची हत्तीवरून मिरवणूक तालुक्यात होण्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचा दुसरा क्रमांक लागला आहे. गावोगावी विकास काम करणे हा छंद आमदार दत्तात्रय भरणे यांचा असल्यामुळे विकासात्मक कायापालट गावोगावी होऊ लागला आहे.
सामान्य नागरिक कार्यकर्ते यांच्याशी संवाद आमदार भरणे यांचा चांगला जुळल्याने, त्यांनी केलेल्या कामाची पावती नागरीक खुलापणाने देत आहोत.कळंब गावकरी यांचे प्रेम पाहुण आमदार दत्तात्रय भरणे यांनी आभार मानले आहे.