Elephant dies – आसामच्या जोरहाट जिल्ह्यात प्रवासी ट्रेनने धडक दिल्याने जंगली हत्तीचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. ईशान्य फ्रंटियर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे यांनी सांगितले की, ही घटना शनिवारी रात्री ११.३० वाजता मारियानी परिसरात घडली. विवेक एक्स्प्रेस तिथून जात असताना त्यात हा हत्ती मरण पावला.
मरियानी परिसराजवळील भेलागुरी चहाच्या बागेच्या परिसरात हत्तींच्या कळपाने रेल्वे ट्रॅक ओलांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा या गाडीने हत्तीला धडक दिली. यापूर्वी ५ जानेवारी रोजी आसाममधील बोको भागात एका हत्तीचे बछडे एका भाताच्या शेतात मृतावस्थेत आढळले होते.
मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. आसामात हत्तीचे कळप रेल्वेचा ट्रॅक ओलांडून जाताना अशा प्रकारच्या दुर्घटना अनेक वेळा घडतात. त्यावर प्रभावी उपाय शोधण्यास वन अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही.