चिंता वाढली! नवा विषाणू अधिक घातक; WHOने दिला “लॉकडाऊन’चा सल्ला

लंडन – करोनाचा नवा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा घातक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे युरोपिय देशांनी कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने युरोपिय देशांना सूचना देताना सांगितले आहे की, आधीच्या करोनापेक्षा संसर्गाचे प्रमाण जास्त आहे.

त्यामुळे मोठी खबरदारी घेण्याची आवश्‍यता आहे. हा करोना विषाणूचा नवा प्रकार आधीच्या विषाणूपेक्षाही घातक असल्यामुळे युरोपिय देशांनी पुन्हा लॉकडाऊन अथवा गर्दीवर कडक निर्बंध घालावे अशी सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे.

नव्या विषाणूचा फैलाव कोरोनाहून कित्येक पटीने अधिक होऊ शकतो. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये याने पाय पसरायला सुरुवात केली. आता या विषाणूने मोठे रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणणानुसार करोना विषाणूपेक्षा 70 टक्के अधिक प्रमाणात याचा संसर्ग सुरु आहे.

सध्याच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या कोरोना विषाणूचा 40 ते 70 टक्‍क्‍यांनी जलद प्रसार होऊ शकतो. त्यामुळे तयार करण्यात आलेल्या कोरोना ‘लस’चा प्रभाव कमी होण्याचा धोका आहे. त्यामुळे नव्याने संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.