नेवासा : नवरा घरात धारदार तलवार घेवून बसल्यामुळे बायकोला नवऱ्याची प्रचंड भिती आणि धास्ती वाटत असल्याने बायकोने चक्क पोलीसांना नवऱ्याची हकिगत सांगितल्याने नेवासा पोलीसांनी तलवारीसह नवऱ्याला अटक केली.
याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, रविवार (दि.२९) रोजी नाशिक पदवीधर मतदानाचे अनुषंगाने नेवासा फाटा येथे पोलीस नाकाबंदी करत असतांना ठाणे अंमलदार पो.हे.कॉ.तोडमल यांनी पोसई भोंबे,पो.हे.काँ. गीते, पो.काँ राठोड, पो.काँ करंजकर कर्तव्य बजावत असतांना फोन आला की, नेवासा पोलीस ठाण्यामध्ये गु.र.नं.१२१/२०२३ मधील फिर्यादी जयश्री विकी चौधरी रा.मार्केट यार्ड नेवासा खुर्द हिने पोलीस ठाण्यास येवुन तिचा नवरा नामे विकी नंदु चौधरी हा हातामध्ये धारदार शस्त्र घेवुन घरामध्ये बसलेला असून तिला घरामध्ये जाण्याची भीती वाटते.
असे सांगितल्यामुळे नेवासा पोलीस ठाण्याचे पोसई भोंबे,पो.हे.काँ.गिते,पो.काँ राठोड,पो.काँ करंजकर घटनास्थळी धाव घेतली असता फिर्यादीचा नवरा नामे विकी नंदु चौधरी हा हातामध्ये धारदार शस्त्र घेवुन घरामध्ये बसलेला दिसून आल्यामुळे एक धारदार तलवारीसह नवऱ्याला नेवासा पोलीसांनी गजाआड केले असून याबाबत पो.कॉ.गणेश गलधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.