मुंबई – मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद प्रसिद्धी झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही. अतंरंगी फॅशनसाठी उर्फी फेमस आहे, चर्चेत राहण्यासाठी ती कधी काय करेल याचा काही नेम नाही. नुकतंच उर्फीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यावरून अनेकांनी तिला ट्रोल तर केलंच शिवाय तू प्रेग्नेंट आहेस का ? असे सवाल देखील विचारले. मग नेहमीप्रमाणे उर्फीने देखील फॅन्सला तिच्या तोऱ्यात उत्तर दिल्याचे दिसून आले.
उर्फीने एक अजिब फॅशन करत व्हिडीओ शूट केला आहे. यामध्ये उर्फी पांढऱ्या रंगाच्या बिकिनी ड्रेसमध्ये दिसून येते. या ड्रेस व्यतिरिक्त उर्फीने आपल्या भोवती एक स्टायलिश दोरी गुंढाळली आहे. ज्यामुळे फॅन्सने तिला ट्रोल केल आहे. चाहत्यांनी तिच्या पोटाबाबत विचारत प्रेग्नेंट असल्याचे म्हंटले आहे. एकाने तर तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे तर दुसऱ्याने माकडाची शेपटी चोरली का ? असा सवाल तिला विचहरला आहे.
View this post on Instagram
उर्फीने चाहत्यांच्या या ट्रोलिंगला उत्तर देत एक फोटो शेअर केला आहे. ‘माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता शिवाय सूज देखील येत होती यामुळे व्हिरीडीओमध्ये मी सेमी प्रेग्नंट असल्यासारखे वाटत आहे’ असं उर्फीने आपल्या पोस्टमध्ये म्हंटल आहे. ट्रॉलर्सना असं उत्तर देत उर्फीने यावेळी सर्व प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. ट्रॉलर्सची मात्र यामुळे अक्षरशः बोलती बंद झाली.