पिंपरी – दक्षिणेकडील आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने, गेली दोन दिवसांपासून दोन दिवस शहर व परिसराचे हवामान ढगाळ आहे. तर हीच स्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याचे पुढील दोन दिवस शहराचे हवामान अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दक्षिणेकडील आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी परिसरातही चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 2.1 किलोमीटर उंचीवर आहे. तसेच अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारची किनारपट्टीजवळ कमी तीव्र दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची संकेत आहेत.
आज त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून त्याचे रुपांतर चक्रीय वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरण होत असल्याने राज्यातील कमाल तापमानात वेगाने बदल होत आहे.
पिंपरी-चिंचवड व परिसरात सोमवारी (दि.5) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 39.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर किमान तापमान 19.8 अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले आहे. पुढील दोन दिवस हवामान अंशत: ढगाळ राहणार आहे.