Bangladesh Weather – बांगलादेशच्या काही भागांत अत्यंत तीव्र’ उष्णतेची लाट सुरू आहे. काही भागात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. बांगलादेशच्या उत्तर, उत्तर-पूर्व आणि उत्तर-पश्चिम जिल्ह्यांवर अत्यंत तीव्र उष्णतेची लाट पसरत आहे
आणि ढाका आणि खुलना विभाग आणि राजशाही जिल्ह्याच्या काही भागात तीव्र उष्णतेची लाट पसरत आहे, असे बांगलादेश हवामान विभागाने म्हटले आले.
बांगलादेशातील सर्वाधिक तापमान रविवारी चुआडंगा येथे ४२.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर राजधानी ढाका येथे शनिवारी हंगामातील सर्वाधिक तापमान ४०.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तीव्र उष्णतेच्या वातावरणात चुआडंगा आणि पबना जिल्ह्यात शनिवारी उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाला. आणखीन पाच दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहील असा इशारा दिला गेला आहे.