‘मूर्खपणाचा कळस’मास्कविना फिरणाऱ्या बॉलिवूड क्वीन कंगनाला नेटकऱ्यांनी सुनावले खडे बोल

मुंबई – कंगना रणावत आपल्या प्रत्येक सिनेमासाठी वेगळ्या प्रकारे मेहनत करत असते. “मणिकर्णिका’साठी तिने घोडेस्वारी शिकली. तर “पंगा’साठी कबड्डी शिकली. “थलायवी’साठी तिने वजन वाढवले आणि आता “तेजस’साठी ती चक्‍क 50 अंश तापमानामध्ये शूटिंग करते आहे.  या सोबतच अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमी चर्चेत असते. कंगना आणि वाद हे आता एक समीकरणच बनलं आहे.आताही अशाच एका घटनेवरून कंगना सोशल मीडियावर ट्रोल होतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन देखील लावण्यात आला आहे. तर मास्क न घालणाऱ्यांवर महानगरपालिका कठोर दंड वसूल करत आहे.  मास्क वापरा असं आवाहन अनेक सेलेब्रिटी करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर आवर्जून सांगत आहेत. पण अभिनेत्री कंगना रणौत  मात्र विना मास्क एका स्टुडिओ बाहेर दिसली.

मास्कचा वापर न केल्यान कंगनाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. ती कधीच मास्कचा वापर करत नाही , कधी कधी मास्क हा तिच्या तोंडावर नाही तर हातात दिसतो अशी कमेन्ट काही लोकांनी केलीय. नेटकऱ्यानी तिच्या फोटोवर ‘मूर्खपणाचा कळस’ असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.  

दरम्यान, बॉलिवूड मधील तारा सुतारिया, आलिया भट्ट  , भूमि पेडणेकर, विक्की कौशल, मोनालिसा, गायक बप्पी लहरी, अभिजीत सावंत कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत. तर टीव्ही आणि वेब विश्वातील ऋत्विक भौमिक, कनिका मान, राजवीर सिंह, शुभांगी अत्रे हे कलाकार कोरोना संक्रमित झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.