नगर – एमआयडीसी पोलीस ठाण्याहद्दीत नागापूर परिसरातील सन फार्म कंपनीसमोर एमआरएफ कंपनीचे गोदाम फोडणारे तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने उस्मानाबाद येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आणखी 12 जण पोलिसांच्या रडारवर आहेत.
बिभीषण राजाराम काळे (वय-51, रा. आंदोरा), बालाजी छगन काळे (वय-38), सुनिल नाना काळे (रा.मस्सा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांना ताब्यात घेतले आहे. याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी मधील 6 डिसेंबर रोजी एमआरएफ टायर्सचे गोदामाची मागील बाजूची भिंत फोडून चोरट्यांनी लाखोंचे टायर बाजूला काटवनात टाकले. मात्र, हे वाहतुकीच्या नादात वेळेचे भान न राहिल्याने त्यांचा दिवसच उजाडला. अन नाइलाजास्तव चोरीचे काही टायर सोडून चोरट्यांना तेथून पळ काढावा लागला. याबबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा बिभीषण काळे व त्याच्या सहकाऱ्यांनी केला असल्याचे खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार गणेश इंगळे, सोन्याबापू नानेकर,सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, आण्णा पवार, रवींद्र कर्डिले, भागीनाथ पंचमुख, विशाल दळवी, विश्वास बेरड, राहुल सोळूंके, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, बाळासाहेब भोपळे यांच्या पथकाने कळंब (जि.उस्मानाबाद) येथून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हा गुन्हा तात्या रमेश काळे, पिल्या रवींद्र काळे, सुभाष भास्कर काळे, रमेश लघमन काळे, सुनिल कालीदास शिंदे, दादा उर्फ राजेंद्र छगन काळे, बंड्या उर्फ शहाजी बाबूराव काळे, श्याम बिभीषण काळे यानी मिळून गुन्हा केल्या असल्याचे सांगितले असून ते अद्यापही फरार आहेत.