अभिनेत्री तापसी पन्नूने मार्चमध्ये उदयपूरमध्ये डॅनिश बॅडमिंटनपटू-कोच मथियास बोसोबत गुपचूप लग्न केले होते. अभिनेत्रीच्या लग्नात फक्त तिचे कुटुंबीय आणि काही मित्र उपस्थित होते. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापसीच्या लग्नाचे आणि संगीत फंक्शनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाले होते, ज्यांनी तिच्या लग्नाची पुष्टी केली होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की तिने तिच्या लग्नाच्या पोशाख डिझाइन करण्यासाठी कोणत्याही मोठ्या फॅशन डिझायनरची निवड केली नाही कारण तिला तिच्या लग्नाची बातमी लीक होऊ नये असे वाटत होते. तापसी म्हणाली, “जेव्हा तुमच्यासोबत एखादे मोठे नाव असते, तेव्हा बातम्या लीक होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि मला लग्न खूप खाजगी ठेवायछे होते. म्हणून माझी कॉलेजची मैत्रीण, मणी भाटियाने माझे सर्व कपडे डिझाइन केले
लग्नासाठी तुम्ही पारंपारिक लाल सलवार कमीज का निवडला?
तिने तिच्या लग्नासाठी पारंपारिक लाल सलवार कमीज का निवडला हे देखील अभिनेत्रीने उघड केले. ती म्हणाली, “मी शीख, गुरुद्वारातील विवाहसोहळे पाहत मोठी झाली आहे, त्यामुळे माझ्यासाठी विंटेज कल्पना, लग्न करण्याची क्लासिक कल्पना नेहमीच लाल सलवार कमीज आणि बॉर्डर असलेला दुपट्टा राहिली आहे. मला हाच एकमेव मार्ग माहित आहे.’ असं म्हणत तिने आपल मत मांडलं आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तापसीचा शेवटचा रिलीज झालेला शाहरुख खानसोबतचा ‘डिंकी’ होता. यावर्षी अभिनेत्रीचे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांमध्ये ‘वो लड़की है कहाँ’, ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘खेल खेल’ यांचा समावेश आहे.