Dainik Prabhat
Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

हंगामी गावाला आता हळवेपणाची किनार… चाललो आमच्या घरा

by प्रभात वृत्तसेवा
April 14, 2019 | 6:53 pm
A A
हंगामी गावाला आता हळवेपणाची किनार… चाललो आमच्या घरा

प्रा. डी. के. वैद्य /अकोले: ‘हंगामी वसाहत केलेल्या गावांना आता एकच लगबग उडाली आहे. आता हे गाव सोडून त्यांना आपल्या मायभूमीकडे, आपल्या गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळेच हंगामी वसाहत केलेल्या गावांना आता हळवेपणाची किनार लाभली आहे.

संपला येथला चारा !
संपला येथला निवारा !
पाठीशी ऊन-वारा !!!
चाललो आमच्या घरा !!!!
अशी काहीशी स्थिती गेले तीन दिवस ऊस वसाहत ऊसतोड कामगारांच्या अड्ड्यावर भेट दिली असता आढळून आली.

अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी जवळपास सहा महिने ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांनी अकोले, इंदोरी, आगार, कोतूळ व अन्य गटांत आपले हंगामी गावेचं वसवली होती. या गावांमध्ये त्यांचा निवारा होता. त्यांच्या जनावरांना चारा होता. आणि एवढेच नाही, तर त्यांचा सर्वच हंगामी गावाचा या ठिकाणचा एक आपुलकीचा धागा जोडला गेला होता. परंतु अगस्ती सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस लागवड असणाऱ्या पाच गटांतील ऊस तोड संपल्याने ऊसतोड कामगारांना हंगामी गावांपासून अलविदा करण्याची वेळ आली आहे. कन्नड, औरंगाबाद, पाथर्डी, बीड व अन्य ठिकाणांहून आलेल्या ऊसतोड कामगारांना आता घरी जाण्याची अनिवार ओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आपल्या उभ्या असणाऱ्या कोप्या, त्यातील जीवनावश्‍यक साहित्य, गाडगी, मडकी, स्टील भांडी, टाक्‍या व अन्य जीवनावश्‍यक वस्तू बाहेर काढताना दिसून आले. प्रत्येकाच्या तोंडी आता एक हळवेपणाचे शब्द बाहेर पडत होते. ‘साहेब, आता उन्हाचा कडाका वाढला आहे. हंगाम संपला आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. म्हणून आता आम्हाला आमच्या घराकडे जाण्याची तीव्र ओढ निर्माण झाले आहे’.

पूर्वी ऊस तोड हंगाम संपल्यानंतर आपला प्रपंच गाडीमध्ये घेऊन बैलगाडी मागे बैलगाडी, त्यामागे पायी चाललेली मोठी माणसे, कारभारीण व चिली पिली गाडीत, असे चित्र दिसत होते. एकापाठोपाठ एक मुक्काम करीत करीत ऊसतोड कामगार घरी पोहोचत असत. परंतु आता बैलगाड्यांचा प्रवास थांबला आहे. कारखाना ऊसतोड कामगारांना बैलगाड्या पुरवतात. कामगार फक्त गावाकडून बैल घेऊन येतात. काहीजण तर आता ट्रॅक्‍टरच्या साह्याने ऊस वाहतूक करत असल्यामुळे बैल आणण्यासाठीचा त्यांचा प्रवास थांबला आहे. ट्रकच्या व ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने आता ऊस वाहतूक होत असल्यामुळे त्यांना आता बैलगाड्यांची ही जरुरत राहिलेली नाही. बदलत्या काळानुसार आता ट्रक किंवा ट्रॅक्‍टर यांच्या साह्याने ऊस स्थळापासून, तर कारखान्यापर्यंत वाहतूक होत असल्याने तेच चित्र आता हे कामगार घरी परतताना दिसत आहे. अशी एक आठवणीची भावना रोहिदास गिरीधर पवार या कामगाराने माहिती देताना व्यक्त केली.

स्टील, ऍल्युमिनियमची भांडीकुंडी, जनावरांचा चारा, बैल घेऊन या कामगारांचा परतीचा प्रवास पुन्हा घराकडे जाण्यासाठी सुरू झाला आहे. पण आता हा प्रवास मोठ्या ट्रकमध्ये सुरू झाल्याचे रोहिदास यांनी सांगितले. आता जमाना बदलला आहे. यंदा दुष्काळ आहे. दुष्काळात घरी ज्यांच्याकडे चारा आहे ते जनावरे घेऊन चालले आहेत. तर काहींनी निम्मे पैसे घेऊन, काहीनी खरेदीच्या मुदलात खोट खाऊन आपले बैल याच ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांना विकले आहेत, अशी माहिती रामेश्वर शंकर चव्हाण (बीड) यांनी दिली.

या गडबडीमध्ये अकोले तालुक्‍यातील माणसे खूप चांगले आहेत. त्यांच्याकडे मदतीची भावना असते. मदतीची भावना घेऊन येथील बागायतदार, शेतकरी किंवा अन्य शेतकरी सातत्याने गेली अनेक वर्ष आम्हाला मदतच करत आहेत. अशा प्रतिक्रिया अड्डा प्रमुख चव्हाण, जाधव यांनी व्यक्त केली. यंदा खूप चांगला धंदा झाला. काही काहींनी लाख लाख रुपये कसोटीला, कनवटीला बांधले. आणि घरी परत जात आहोत,’ अशा प्रकारची माहिती अलका रामचंद्र चव्हाण या महिलेने दिली.
(पूर्वार्ध )

Tags: ahmedngar newsfarmerMAHARASHTRA

शिफारस केलेल्या बातम्या

महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील
पुणे

महाराष्ट्र कायम अग्रेसर राहील

4 hours ago
शेतकऱ्याचा नादखुळा! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून पिकवली स्वित्झर्लंडची पिवळी आणि जांभळी फुलकोबी
latest-news

शेतकऱ्याचा नादखुळा! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून पिकवली स्वित्झर्लंडची पिवळी आणि जांभळी फुलकोबी

18 hours ago
उत्तर काशीमध्ये महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू
Top News

उत्तर काशीमध्ये महाराष्ट्रातील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू

1 day ago
संशोधकांचा निष्कर्श : सर्दीमुळे झालेल्या ‘ऍन्टीबॉडीज’मुळे होऊ शकतो करोनापसून बचाव
Top News

महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“करोना रुग्णवाढ कायम राहिली तर राज्यात निर्बंध लागणार?”; मंत्री अस्लम शेख यांचा सावधानतेचा इशारा

नागपूरात राणा दाम्पत्य अन् राष्ट्रवादी आमनेसामने; एकाच मंदिरात करणार हनुमान चालीसा पठण

“ईडी आता योगी आदित्यनाथांवर छापे मारणार का?”; अनिल परब प्रकरणावरुन शिवसेनेचा सवाल

अरे देवा! दक्षिण सुदानमध्ये मेंढीने केली महिलेची हत्या

महिलांचा अवमान करणे ही भाजपची संस्कृती – योगेश बहल

पुणे : देहूच्या मुख्य मंदिरात भागवत पताका खांब

आजार नसतानाही ‘या’ समस्येमुळे दरवर्षी होतोय लाखो लोकांचा मृत्यू !

पुणे : ससूनमधील नियोजित शस्त्रक्रिया रद्द

पुणे : मिळकतकर उत्पन्न 200 कोटींनी वाढले

तुमच्‍या ‘आधार’चा आधार घेऊन तुमच्‍या नावाचे सिमकार्ड इतर कुणी तर वापरत नाही ना?

Most Popular Today

Tags: ahmedngar newsfarmerMAHARASHTRA

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!