मथुरा – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि बॉलिवूड मधील ड्रीम गर्ल हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मागील काही दिवसांपासून हेमा मालिनी या आपल्या प्रचारासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र हेमा मालिनी यांच्या प्रचारासाठी अभिनेता धर्मेंद्र प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मथुरेमध्ये हेमा मालिनी यांचा प्रचार करण्यासाठी धर्मेंद्र यांनी उपस्थिती नोंदवत एका जाहीर सभेला संबोधित केले.
Mathura: Actor Dharmendra campaigns for Hema Malini, BJP MP & party's candidate from the Parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/yD9wKDWsKA
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 14, 2019
प्रत्येक उमेदवार आपल्या वेगवेगळ्या उपायांनी मतदाराला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच अभिनेत्री हेमा मालिनी यांनी देखील मतदाराला आकर्षित करण्यासाठी मागच्या वेळी चक्क ट्रॅक्टर चालवला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी शेतातील गहू कापण्यास शेतकऱ्यांची मदत केली होती.