दिल्लीत पुन्हा त्याच इमारतीला आग

नवी दिल्ली : दिल्लीच्या रानी झांसी रोडवर अनाज मंडी परिसरात काल भीरूण आग लागली होती. यात 43 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. दरम्यान, आज सकाळी पुन्हा एकदा इथे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. काल ज्या इमारतीला आग लागली होती त्याच इमारतीला पुन्हा आज आग लागली आहे. यावेळी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या रवाना झाल्या आहेत.


रविवारी लागलेल्या आगीत 43 लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. तसेच आज कोर्टात आरोपी रेहान आणि फुरकान यांना पोलीस हजर करणार आहेत. यांच्यावर 304 कलम आणि 308 कलम अंतर्गत गन्हा दाखल केला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास 10 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.

पहाटे पाच वाजता आग लागल्यामुळे सर्वजण गाढ झोपेत होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस दाखल झालेत. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावर आहे. आगीत जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या एलएनजेपी रूग्णालयात दाखल करण्यात आहे. याठिकाणी दोन प्लॉस्टीकचे कारखाणे असल्याचे समोर येत आहे.

रस्ता अरूंद असल्यामुळे आडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागत आहे. रविवार असल्यामुळे वाहतूक कोंडी नाही. पण बघ्यांनी मात्र भरपूर गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीस गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.