मुंबई – राजकुमार राव आणि त्याची दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड पत्रलेखा हे विवाहबद्ध होत आहेत. चंदिगडमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा होणार असल्याचे समजते आहे.
वधू आणि वर दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील असले तरी फिल्मी दुनियेतील फारच मोजके लोक या विवाह समारंभाला निमंत्रित आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा या दोघांनाही करोनाच्या साथीमुळे हा विवाह समारंभ अगदी छोटा आणि खासगी स्वरूपाचा करायचा होता.
म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता हा विवाह पार पडत आहे. म्हणूनच त्यांनी आपली पाहुण्यांची यादी अगदी मर्यादित ठेवली आहे आणि लग्न मुंबईत न करता चंदिगडला करायचे ठरवले आहे. राजकुमार आणि पत्रलेखा दोघेही खूप काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
राजकुमारने पत्रलेखाला एका जाहिरातीत बघितले आणि मैत्री वाढवण्याचे ठरवले होते. त्यानंतर गेली 7 वर्षे त्यांच्यातील मैत्री फुलतच गेली. मात्र, त्यांनी आपल्या लग्नाच्या तयारीची कोणतीही घोषणा केलेली नव्हती. 11 ते 13 नोव्हेंबरदरम्यान या दोघांचे लग्न होईल, असा अंदाज एका इंटरटेनमेंट पोर्टलने व्यक्त केला होता.