मतदान करणाऱ्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार – मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात सुरू असणाऱ्या विधानसभेच्या मतदानाला आज अनेक ज्येष्ठ नेत्यांसह सर्वसामान्य आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरमध्ये कुटूंबासमवेत मतदान केले. यावेळी त्यांनी लोकांच्या सरकारकडून अपेक्षा असतात. आशा-आकांक्षा असतात. पण त्या पूर्ण करायच्या असतील तर मतदान केले पाहिजे. मतदान करतील त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार आहे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि आपल्या आईसोबत नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला.


मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कोणतेही राजकीय मतप्रदर्शन करण्यास नकार दिला. आचारसंहिता सुरू आहे. आमची भूमिका आम्ही जाहीरनाम्यात मांडली आहे, असे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, निवडणुका हा लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आहे. माझी राज्यातील जनतेला विनंती आहे की त्यांनी मतदानाला गेले पाहिजे. मतदानाचे महत्त्व वेगळे असते. लोकांच्या सरकारकडून अपेक्षा असतात. आशा-आकांक्षा असतात. पण त्या पूर्ण करायच्या असतील तर मतदान केले पाहिजे. जे मतदान करतात त्यांनाच सरकारकडे अपेक्षा मांडण्याचा अधिकार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.