विधानसभा निवडणुक: हरियाणात आतापर्यंत 13.37 टक्‍के मतदान

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुका 2019 साठी आज मतदान सुरू आहे. सकाळी सहा वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. राज्यात 90 जागांसाठी 1168 उमेदवारांमध्ये चुरशीची टक्कर आहे. एकूण 1846 उमेदवारांनी पत्रक दाखल केले होते. दरम्यान, हरियाणात सकाळी 11 वाजेपर्यंत 13.37 टक्‍के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

हरियाणात आज सकाळपासूनच मतदानास सुरूवात झाली आहे. मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्या 13.37 टक्‍के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्यात एकूण 1 कोटी 83 लाख 90 हजार 525 लोक मतदानाचा हक्क बजावत आहेत. यामध्ये 1 लाख 7 हजार 955 सेवा मतदारांचा समावेश आहे. येथे 98 लाख 78 हजार 42 पुरुष मतदार, 85 लाख 12 हजार 231 महिला मतदार आणि 252 ट्रान्सजेंडर मतदार आहेत.

* जिल्हावार टक्‍केवारी

पंचकुला- 10.33
अंबाला- 16.85
यमुनानगर- 13.67
कुरुक्षेत्र- 11.31
कॅथल- 13.73
करणेल- 12.64
जलपत- 7.70
सोनीपत- 12.32
जींद- 16.00
फतेहाबाद- 11.80
सिरसा- 16.45
हिसार- 13.06
भवानी- 21.94
रोहक- 12.89
झज्जर- 10.24
महेंद्रनगर- 8.43
रेवाड़ी- 20.88
गुरुग्राम- 11.74
फरीदाबाद- 12.19
मेवात -18.5
पलवल- 8.88
चरखी दादरी- 16.74

Leave A Reply

Your email address will not be published.