पंतप्रधानांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ आमच्यासोबत साजरा करावा

शाहिन बागच्या आंदोलनकर्त्यांची मागणी

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्त्व कायदा आणि नागरिकत्त्व नोंदणीविरोधात गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ शाहिन बागेत आंदोलन सुरू आहे. दरम्यान, इथे आंदोलकांनी, मोदींना व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचे आमंत्रण दिले आहे. मोदींनी कृपा करून शाहिन बागेत यावे, त्यांच्यासाठी एक अनपेक्षित भेटवस्तू आहे ती देखील त्यांनी स्वीकारावी, असे इथल्या आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

या आंदोलनकर्त्यांनी प्रेमाचे गीत लिहिलं आहे तसेच मोदींसाठी भेटही तयार केली आहे. ‘आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांपैकी कोणीही यावे. ते आमच्याशी संवाद साधू शकतात. जे काही सुरु आहे ते संविधानाच्या विरोधात नाही हे त्यांनी आम्हाला पटवून द्यावे आम्ही हे आंदोलन थांबवायला तयार आहोत’, असे शाहिन बागेतील आंदोलनकर्ते सईद अहमद पीटीआयशी साधलेल्या संवादात म्हणाले.

सुधारिकत नागरिकत्त्व कायद्यामुळे देशाला कसा फायदा होईल हे तरी समजून सांगावे. या कायद्यामुळे बेरोजगारी, गरिबी, आर्थिक मंदी या महत्त्वाच्या मुद्द्यावर कसा तोडगा निघणार आहे हे सांगा? असाही सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे. सोमवारी शाहिन बाग परिसरात गेल्या 50 हून अधिक दिवसांपासून रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांना तातडीने हटविण्याचे आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्याचवेळी कोणतेही आंदोलक सार्वजनिक वाहतुकीचा रस्ता बेमुदत काळासाठी अडवून आंदोलन करू शकत नाहीत, असेही न्यायालयाने सूचकपणे स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.