मुंबई :बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या करियर आणि आयुष्याबद्दल कोण-कोणती स्वप्ने पाहिली नसतील, परंतु आत्महत्या केल्याने ही सर्व स्वप्ने चिरडली गेली आणि तोही सर्वापासून दूर गेला.
स्वतःचा “दिल बेचारा’ हा चित्रपटदेखील पाहण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. सुशांतसिंह राजपूतंचा “दिल बेचारा’ हा शेवटचा चित्रपट आता ओटीपी प्लॅटफॉर्मवर 24 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूर आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी सुशांतच्या ज्या चार डायऱ्या जप्त केल्या होत्या त्यातून बरीच माहिती पोलिसांना मिळाली आहे. सुशांतच्या कंपनीत रिया चक्रवर्ती आणि शोबिज चक्रवर्ती हे भागीदार आहेत ही माहिती त्यांना मिळाली आहे.
कंपनीत संचालक कोण कोण असतील, त्यांच्या भूमिका काय असतील, त्यांचा आर्थिक सहभाग इत्यादी सर्व गोष्टींबाबत सुशांतने नोंदी केल्या असून त्याची माहिती त्या डायऱ्यांमध्ये सापडली आहे.
सुशांची माजी मॅनेजर श्रुती मोदीने दिलेल्या माहितीवरून पोलिसांना अनेक गोष्टी कळाल्या होत्या. सुशांतने या डायऱ्यांमध्ये त्याची स्वप्न आणि गोल्स याचाही उल्लेख केला होता.
दरम्यान, आता या प्रकरणात अभिनेत्री संजना सांघवीचा जबाब मुंबई पोलीस नोंदविणार आहेत. सोमवारी तिचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. या आधी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली असून सुशांत बद्दल बऱ्याच गोष्टी पोलिसांना कळाल्या आहेत.
सुशांतच्या शेवटच्या चित्रपटात ती सोबत असल्याने त्याची मानसिक स्थिती काय होती याची आणि इतर गोष्टींची माहिती पोलिसांना मिळू शकते. पण या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्या दोघांचे संबंध फारसे चांगले नव्हते. सुशांतने जास्तच जवळीक दाखवत चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप संजनाने केला होता.