कोकणचा फणस रूसला
पुणे – पावसाळ्याच्या प्रारंभी विविध फळे दाखल होतात. गोड, रसदार फणस हे त्यातीलच एक फळ. सध्या कर्नाटकातील फणस बाजारात दाखल होत आहेत. याला मागणी अधिक असते. मार्केट यार्ड परिसरासह शहरातील विविध रस्त्यांवर फणसाच्या गऱ्यांची विक्री होत आहे. मात्र, करोनाचा फटका फणसालाही बसला आहे. मागणी अभावी आवक घटली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भावही कमीच आहेत.
घाऊक बाजारात फणसाच्या एका नगाला 50 ते 200 रुपये भाव मिळत आहे. कर्नाटकातून रोज एका गाडीची आवक होत आहे. यंदा कोकणातील फणस विक्रीला आला नाही. दर वर्षी या काळात बाजारात 5 ते 6 गाड्यांची आवक होते. प्रति नगाला
100 ते 300 रुपये भाव असतो. बाजारात विक्रीला आलेल्या फणसात 80 टक्के कर्नाटकचा असतो. तर, 20 टक्के कोकणातला असतो, असे व्यापारी सय्यद ताहीर यांनी सांगितले.
पुण्याच्या बाजारात येणाऱ्या खापा फणस
अधिक गोड
कर्नाटकातील हसन, टुकूर, लखूर आणि लाकूसपेठ येथून आवक खापा फणसाची आवक होते. खापा फणस तुलनेने चवीला गोड असतो. तो अधिककाळ टिकतो. या फणसाच्या गऱ्याला चिवटपणा कमी असतो.
—
फणसांचे प्रकार : खापा, रसाळ
खापा फणस अधिक गोड
कर्नाटकातील हसन, टुकूर, लखूर आणि लाकूसपेठ येथून आवक खापा फणसाची आवक होते. खापा फणस तुलनेने चवीला गोड असतो. तो अधिककाळ टिकतो. या फणसाच्या गऱ्याला चिवटपणा कमी असतो.
कोकणी फणसाला गोडवा कमी
रसाळ फणसाची आवक कोकणातून होते. तर, कोकणातील रसाळ फळसाच्या गऱ्याला चिवटपणा अधिक असतो. कर्नाटकच्या तुलनेत या फणसाच्या गऱ्याला कमी गोडी असते. या फणसाचा गर अधिककाळ टिकत नाही.