पुणे -राज्यात पुढील दोन दिवसांत (दि. 28 आणि 29) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर पश्चिम विदर्भात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सूनने देशाचा सर्व भूभाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेनुसार 8 जुलै रोजी देशभरात पोहचणाऱ्या मान्सूनने यंदा तब्बल 12 दिवस आधीच देशाच्या सर्व भागात मजल मारली. पण, सध्या देशभरातील शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात चार दिवसांपासून उकाडा अधिक वाढला आहे. दि. 27 आणि 28 रोजी जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविली आहे.