नवी दिल्ली – देशातील करोनामुक्त होण्याचे प्रमाण जवळपास 75 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या 24 तासात 57 हजार 989 रुग्ण बरे झाल्यामुळे, ही रुग्ण बरे होण्याची संख्या आज 22 लाख 80 हजार 566 वर पोहोचली आहे.
देशातील रुग्ण बरे होण्याची संख्या आता सक्रिय रुग्णांपेक्षा 16 लाखांनी वाढली आहे.
रुग्ण बरे होण्याची दैनंदिन सरासरी संख्या ऑगस्ट या आठवड्यात सातत्याने वाढत आहे.
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत निरंतर वाढ होत असल्यामुळे देशातील वास्तविक सक्रिय रुग्णांची संख्या आता कमी होत आहे आणि एकूण सक्रिय रुग्णांपैकी केवळ 23.24 टक्के सक्रिय रुग्ण सध्या आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
देशातील हळूहळू मृत्यूदर कमी होत आहे. सध्या देशातील रुग्णांचा मृत्यू दर 1.86 टक्के इतका असून जगातील सर्वांत कमी दर असणाऱ्या देशांपैकी एक आहे.