पुणे -जिल्ह्यातील करोना बाधित संख्येने आज तब्बल 5 हजारांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक बाधित संख्या आहे. गेल्या 24 तासांत ग्रामीण भागात (नगरपालिका, कॅन्टोन्मेंट) एकूण 905 बाधित सापडले आहेत.
त्यामध्ये ग्रामीणमध्ये 664, नगरपालिकेत 190 आणि कॅन्टोन्मेंटमध्ये 51 बाधितांचा समावेश आहे. मागील चार दिवसांपासून नगरपालिका हद्दीमध्ये बाधित सापडण्याचे प्रमाण वाढत आहे.
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील बाधित संख्येने 4 हजार 200 पर्यंत मजल मारली आणि आज तब्बल पाच हजारांचा टप्पा गाठला.शहर हद्दीत 2 हजार 834, पिंपरी-चिंचवडमध्ये 1 हजार 326 बाधित सापडले आहेत. दरम्यान, ग्रामीणमध्ये दररोज पन्नास ते शंभरने बाधित संख्या वाढत आहे.
गेल्या 24 तासांत करोनामुळे पुणे जिल्ह्यात 24 जणांचा मृत्यूची नोंद झाली. त्यामध्ये पुणे शहरात 15, पिंपरी-चिंचवडमध्ये 4, नगरपालिका 1, कॅन्टोन्मेंटमध्ये 2 तर ग्रामीणमध्ये 2 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 2 हजार 211 जण करोनामुक्त झाले आहेत.