सीबीआयच्या तपासणीत सरकारी कार्यालये रडारवर

नवी दिल्ली – सीबीआयने शुक्रवारी दक्षता विभागाच्या सहकार्यातून भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त मोहीम राबवली. त्या विशेष मोहिमेवेळी देशभरातील सरकारी कार्यालयांची अचानकपणे तपासणी करण्यात आली. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील कार्यालयांची झाडाझडती घेण्यात आली.

रेल्वे, भारतीय अन्न महामंडळाची कार्यालये, दारूगोळा कारखाना आणि काही विभागांच्या गोदामांमध्ये तपासणी करण्यात आली. भ्रष्टाचार घडू शकणारे विभाग ध्यानात यावेत यासाठी ती कारवाई करण्यात आली. संबंधित ठिकाणी कुठले गैरप्रकार सुरू नसल्याची खातरजमा करण्याच्या दृष्टीने संबंधित तपासणी मोहीम महत्वाची मानली जात आहे. विशेष मोहिमेवेळी काही कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. पुढील आवश्‍यक कारवाईसाठी त्यांची छाननी केली जात असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.