नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात तांडव केला आहे. त्यातच भारतातही कोरोना व्हायरसने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत. फोफावत जात आहेत. देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे.
देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत.
देशातील कोरोना संक्रमणाचा ग्राफ वाढत आहे. वाढता ग्राफ पाहता आरोग्य मंत्रालयाने 40 हजार व्हेंटीलेटरची ऑर्डर दिली आहे. यापैकी 30 हजार व्हेंटीलेटर हे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीकडून घेण्यात येणार आहे. तर HLL कडून 10 हजार व्हेंटीलेटर घेण्यात येणार आहे.