करोनाच्या काळात जेवढ्या सेलिब्रिटीना करोनाचा संसर्ग झाला, त्यामध्ये गायिका कनिका कपूर देखील होती. तिच्या करोना संसर्गाची चर्चा सोशल मिडीयावर खूप झाली. त्यामुळेच तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी लोकांनी गुगलवर तिच्या नावाचा खूप सर्च केला होता.
View this post on Instagram
या वर्षभरात इंटरनेटवर जेवढ्या सेलिब्रिटीजच्या नावाने सर्च केला गेला, त्यामध्ये कनिका कपूरचा क्रमांक तिसरा लागतो आहे.
इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि भावी अध्यक्ष ज्यो बायडेन हे पहिल्या क्रमांकावर आणि रिपब्लिकन टिव्हीचे पत्रकार अर्णब गोस्वामी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. लंडनच्या ट्रीपवरून एप्रिल महिन्यात मुंबईला परत आल्यावर कनिका कपूरला करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते.
View this post on Instagram
करोनाबाबत निष्काळजीपणा केल्याची टीकाही तिच्यावर झाली होती. चाचणी न करता लखनौमधील पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे देखील तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. तेंव्हा एखाद्या सेलिब्रिटीला करोनाचा संसर्ग होण्याची वेळ नव्यानेच पुढे आली होती.
View this post on Instagram
त्यामुळे तिच्या नावाचा सर्च नेटकऱ्यांनी खूप केला होता. तिच्या पाठोपाठ अमिताभ बच्चन यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. त्याबाबत सर्च होणाऱ्यांमध्ये अमिताभ यांचा पाचवा क्रमांक लागतो.