शाहरुख खानचा आगामी “पठाण’मध्ये डिंपल कपाडिया चक्क गुप्तहेराच्या रोलमध्ये दिसणार आहे. “पठाण’ हा सिनेमाच हेरगिरीवर आधारलेला आहे. प्रत्येक गुप्तहेराची स्वतःची एक टीम असते. त्यामध्ये काही इंटिलिजन्सही असतात. त्यानुसार शाहरुखच्या टीममधील एक इंटिलिजन्स ऑफिसरचा रोल करताना डिंपल बघायला मिळणार आहे.
View this post on Instagram
शाहरुखने “पठाण’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहे. शाहरुख बरोबर दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील असणर आहेत. स्वतः शाहरुखकडे ऍक्शन हिरोचा रोल असेल.
View this post on Instagram
तर जॉन अब्राहम हा खलनायकाच्या रोलमध्ये असेल. पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये “पठाण’ रिलीज होणार आहे. “पठाण’व्यतिरिक्त “टेनेट’ या हॉलिवूड फिल्ममध्ये देखील डिंपल दिसणार आहे.
View this post on Instagram
भारतामध्ये “टेनेट’ 4 डिसेंबरला रिलीज होण्याची घोषणा झाली होती. हा एक सायन्स फिक्शन असेल आणि ख्रिस्तोफर नोलान या सिनेमाचा हिरो असणार आहे. “टेनेट’चे शूटिंग भारताबरोबर अमेरिका, ब्रिटन, डेन्मार्क, इस्टोनिया, इटली आणि नॉर्वेमध्ये झाले आहे. भारतात हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलगूमध्ये “टेनेट’ रिलीज होणार आहे.