Sanjay Dutt Viral Video| बॉलीवूड अभिनेता संजय दत्त त्याच्या चित्रपटांसह नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या मुंबई विमानतळावरील त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो सेल्फी घेण्यासाठी आलेल्या चाहत्याला धक्का मारताना दिसतो. यानंतर काही जण संजय दत्तवर टीका करत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत संजय दत्त एका पार्कींग लॉटमध्ये चालताना दिसत आहे. तो फोटो काढण्याच्या मूडमध्ये नसल्याचे दिसते. तो पापाराझींशीही बोलला नाही. याच वेळी एअरपोर्टवरच्या पार्किंग लॉटमध्ये एका उत्साही चाहत्याचा त्याला राग आला. तो चाहता संजय दत्तच्या जवळ येऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याने त्या फॅनला दूर ढकले आणि संजय दत्त गाडीत बसून निघून गेला. संजय दत्तचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली.
eView this post on Instagramee
संजूबाबाच्या आगामी वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रवीना टंडन, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल आणि जॅकी श्रॉफ यांच्यासोबत ‘बाप’ सिनेमात दिसणार आहे. याशिवाय अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमात सुद्धा तो अभिनय करताना दिसणार आहे. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
संजय दत्त राजकारणात येत असल्याच्या चर्चा
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय दत्त पुन्हा एकदा राजकारणात येत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. तो एका विशिष्ट राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवू शकतो, असा दावाही केला जात होता. मात्र, आता खुद्द संजयनेच राजकारणाच्या दुनियेत प्रवेश करतोय की नाही हे स्पष्ट केले.
त्याने त्याच्या अधिकृत एक्सवर पोस्ट करत ,”जर मी राजकारणात जायचे ठरवले तर मी स्वतः ते जाहीर करेल. माझ्याबद्दल जे काही बातम्या येत आहेत त्यावर विश्वास ठेवू नका,” असे सांगितले होते.
हेही वाचा:
रत्नागिरीत शेतजमीन, संपत्तीत 11 कोटींची वाढ; जाणून घ्या राजन विचारे यांची एकूण मालमत्ता…