मेडिकल चालकास पिस्तूलाचा धाक दाखवून लूटले

पुणे – मेडिकमध्ये घुसून पिस्तूल आणि चाकुचा धाक दाखवत 23 हजाराचा ऐवज लूटण्यात आला. ही  घटना बालेवाडी येथील न्यु अंबिका मेडिको शॉप येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी उमेदराम नैनाराम चौधरी(21) हे त्यांच्या मेडिकल शॉपमध्ये रविवार रात्री काऊंटरवर असताना तीन व्यक्ती ग्राहक असल्याचा बहाणा करत आत आले. यातील एकाने पिस्तूल तर एकाने चाकूसारख्या हत्याराचा धाक दाखवत चौधरी यांना मारहाण केली. यानंतर गल्ल्यातील 18 हजार रुपये, गळ्यातील चांदीचे चैन असा 23 हजार रुपयांचा ऐवज जबरी चोरी करुन घेऊन गेले. मेडिकलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद झाले आहेत. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

मेडिकलचे शटर उचकटून रोकड चोरली
मेडिकलचे शटर उचकटून 22 हजार 500 रुपयांची रोकड चोरण्यात आली. ही घटना पुणे-आळंदी रस्त्यावरील गौरव मेडिकल येथे घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी निवृत्ती दिनकर तांबे (54,रा.आळंदी रोड) यांचे म्हस्के वस्ती येथे गौरव मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर नावाचे दुकान आहे. हे दुकान बंद असताना रविवारी रात्री ते सोमवारी सकाळ दरम्यान ही घटना घडली.

Leave A Reply

Your email address will not be published.