तुमच्या मुलीला जर कोणी ड्रग्स दिले असते तर …

अभिनेत्री कंगनाने विचारला जया बच्चन यांना खोचक प्रश्न

मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीला आणि त्यातील कलाकारांना  सोशल मीडियावर घराणेशाही वरून चांगलाच टीकेचा सामना करावा लागतो आहे.  यावरूनच “ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात”, अशा शब्दांत जया बच्चन यांनी टीका केली आहे.

याच टीकेवर अभिनेत्री  कंगना खोचक प्रश्न विचारत ट्विट केले आहे. “जयाजी, माझ्या जागी तुमच्या मुलीला आणि मुलाला  छळ व गुंडगिरीचा त्रास  झाला असता तर तुमची मुलगी श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती तर तेव्हा देखील तुम्ही असंच म्हणाला असतात का? 

ती पुढे म्हणाली,’अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा”, असं ट्विट कंगनाने केलं आहे.  

Leave A Reply

Your email address will not be published.