सातारा – माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या हटके स्टाईल मुळे चर्चेत असतात. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. दरम्यान, उदयनराजेंनी आपल्या खास शैलीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वाढदिवसा बद्दल माहिती दिली आहे.
“आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली…त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळते”. असं ट्विट उदयनराजेंनी केलं आहे.
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस.
राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली…त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील लाखो लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळते.#Anniversary pic.twitter.com/eGhZ1MODBT— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 20, 2019
दरम्यान, लग्नाचा वाढदिवस असल्यानं चाहत्यांकडून उदयनराजेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही नेटकरी उदयनराजेंना शु्भेच्छा देत आहेत.