सेऊल, (दक्षिण कोरिया) : दक्षिण कोरियाने आपल्या पहिल्या व्यवसायिक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. दक्षिण कोरियाच्या नव्याने विकसित होत असलेल्या अंतराळ कार्यक्रमाला यामुळे मोठे यश मिळाले आहे.
उत्तर कोरियाकडून हेरगगिरीसाठी अवकाशामध्ये आपला स्वतंत्र उपग्रह सोडण्याची जोरदार तयारी केली असतानाच दक्षिण कोरियाने आपला व्यवसायिक उपग्रह अवकाशात सोडला आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या दोन्ही कोरियांचे आतापर्यंत कोणतेही लष्करी उपग्रह अवकाशात सोडले गेलेले नाहीत. दोन्ही कोरियांना असा उपग्रह अवकाशात सोडायचा आहे. दक्षिण कोरियाने आज अवकाशात सोडलेल्या उपग्रहाच्या माध्यमातून टेहळणीचा उद्देश बहुतांश साध्य होण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडील बेटावरून देशांतर्गत विकसित केलेल्या नूरी रॉकेटच्या माध्यमातून 8 उपग्रहांना अवकाशात सोडण्यात आले. या 8 उपग्रहांमध्येच एक व्यवसायिक देखील आहे. या उपग्रहाचे मुख्य काम रडारच्या माध्यमातून मिळणाऱ्या छायाचित्रांची सत्यता पडताळणी करणे हे असणार आहे.
तसेच पृथ्वीच्या अंतराळ कक्षेजवळील किरणोत्सर्गाचे निरीक्षण करणे हे असणार आहे. या मुख्य उपग्रहाबरोबर सर्व 8 उपग्रहांना अंतराळात व्यवस्थितपणे सोडण्यात आले आहे, असे विज्ञानमंत्री ली जोंग हो यांनी टीव्हीवरील पत्रकार परिषदेत सांगितले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल यांनीही फेसबुकवरच्या पोस्टमध्ये या वृत्ताला दुजोरा दिला आहे.